Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age Increase ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत राज्य शासनांकडून वेगवान हालचाली करण्यात येत आहेत . सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ केल्यानंतर राज्य शासनांच्या तिजोरीवर कोणताही फरक पडणार नाही . उलट राज्य शासनांचा फायदा होईल , यामुळे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागांकडून प्रस्ताव वयार करण्यात येत आहेत .
राज्याचे मुख्य सचिव यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघाची नुकतीच झालेल्या बैठकीमध्ये , राज्यातील कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारच्या धर्तीवर सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये आणखीण 02 वर्षांची वाढ करणेबाबतची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन असून , या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून प्रस्ताव देखिल तयार करण्यात येत असल्याची मोठी माहिती राज्याचे मुख्य सचिव यांनी दिली .
सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ केल्यास राज्य सरकारचा फायदा : सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांची वाढ लागु केल्यास ,सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन तसेच सेवानिवृत्तीनंतचे लाभ द्यावे लागेल . ज्यामुळे दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ राज्य शासनांस देखिल होणार आहे .
कर्मचाऱ्यांना होणार फायदा : अनेक कर्मचारी हे शासन सेवेमध्ये उशिरा लागले आहेत , अशांना मोठा दिलासा मिळणार आहे . सध्या सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहेत , दोन वर्षांची अतिरिक्त सेवेमुळे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ तसेच पेन्शन मध्ये वाढ होईल .
निवडणुकांच्या आचारसंहिता पुर्वीच होणार निर्णय : लोकसभेच्या आचारसंहिता ह्या फेब्रुवारी 2024 पासून लागतील त्यापुर्वीच राज्य शासनांकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहे . या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून प्रस्ताव देखिल तयार करण्यात आला असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.