Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात , सेवानिवृत्तीचे वय वाढविणे बाबत मोठी अपडेट समोर येत आहे . देशांमध्ये तब्बल 25 राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती ( Retirement Age ) चे वय 58 वर्षांवरुन वाढवून 60 वर्षे करण्यात आले आहेत .

केंद्र सरकार व इतर 25 राज्य सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे . राज्यातील या मागणीवर महाराष्ट्र शासन देखिल सकारात्मक असल्याचे नमुद करण्यात आले आहेत , पण निर्णय कधी होणार ? असा प्रश्न कर्मचारी संघटनांकडून राज्य सरकारला विचारला जात आहे .

राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबतचा प्रस्ताव नियोजित असल्याची माहिती राज्य सरकारच्या मुख्य सचिव यांनी कर्मचारी संघटनांच्या बैठकीमध्ये सांगितले आहे . राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून राज्य सरकारला सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत , अनेक पाठपुरावे / निवेदने देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांस 25 वर्षे सेवा झाल्यास पुर्ण पेन्शनचा लाभ तर ,10 टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ !

सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणे राज्य सरकारच्या हिताचे : सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणे सरकारच्याच हिताचे ठरणार आहे , कारण सध्या राज्य शासन सेवेत 2.5 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत , सदर रिक्त पदांवर एका वर्षांमध्येच भरती करणे शक्य नाही .शिवाय काही असे पदे आहेत ज्या पदांवर कंत्राटी / रोजंदारी तत्वावर पदे भरणे शक्य नाही .

नुकतेच राज्य शासनांने रिक्त शिक्षकांच्या जागी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे , परंतु सदर सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्यापेक्षा सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करावी अशी मागणी देखिल शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे . सदर सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी तत्तवार नियुक्ती नंतर केवळ 20,000/- एवढे मासिक मानधन अदा करण्यात येणार असल्याने , सेवानिवृत्त शिक्षकांचा सेवानिवृत्ती नंतर कंत्राटी तत्त्वावर नोकरी करण्याची मानसिकता खुपच कमी असल्याचे दिसून येत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच पात्र कर्मचारी  , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *