Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Year ] : महाराष्ट्र राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे , सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये जुन्या पेन्शन लाभ लागु करण्यात आलेले आहेत . राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी जुनी पेन्शनची होती , त्यानंतर दुसरी मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणे ही होय .
राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत , सकारात्मक आश्वासने दिलेले आहेत . याबाबत अधिवेशांमध्ये विधेयक मांडण्यात येणार होते , परंतु काही सदस्यांचा या विधेयकास विधीमंडळांमध्ये मांडण्यापुर्वीच , मा.मुख्यमंत्री यांना पत्र लिहुन विरोध दर्शविल्याने , याबाबतचे विधेयक अधिवेशांमध्ये मांडण्यात आले नाहीत .
पेन्शनच्या मागणीनंतर आता कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत , लक्ष केंद्रीत : सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये सेवानिवृत्तीनंतर 50 टक्के पेन्शन मिळविण्यासाठी किमान व कमाल सेवेची अट ठेवण्यात आलेली आहे , पेन्शन प्राप्ती करीता कर्मचाऱ्यांचे लक्ष आता सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करण्याकडे वेधले आहेत . सध्या राज्यातील गट अ , ब व क संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे , जर सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे झाल्यास सेवानिवृत्तीनंतर अतिरिक्त पेन्शन लाभ , सेवानिवृत्ती उपदान , रजा रोखीकरण असे आर्थिक लाभ मिळणार आहेत .
यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून राज्य शासनांस वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहेत . याबाबत राज्य सरकार देखिल सकारात्मक असल्याने , या संदर्भातील अधिकृत्त निर्णय आगामी विधानसभा निवडणुका पुर्वीच घेण्यात येईल . कारण आता राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनाची मागणी मान्य झाल्याने , आता सेवानिवृत्तीचे वय वाढीकडे आपला मोर्चा वळविणार असल्याची माहिती समोर येत आहे .
देशांमध्ये केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर इतर राज्यांपैकी 25 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे असल्याने , त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षावरुन 60 वर्षे करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे .सेवानिवृत्तीचे वय वाढीची वाट पाहता अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत , ही बाब देखिल सरकारने विचारात घेणे आवश्यक आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.