लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनांकडून गठित अभ्यास समितीकडून अहवाल तयार करण्यात येत आहेत .राज्य कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्च 2023 रोजी जुनी पेन्शन मागणीसह इतर अनेक मागणीकरीता संप करण्यात आले होते , या संपामध्ये जुनी पेन्शन योजना प्रमुख मागणी होती .त्यानंतर दुसरी मोठी मागणी म्हणजे केंद्र सरकारच्या व देशातील तब्बल 25 राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय (Retirement Age ) 60 वर्षे करणे होती .
राज्य कर्मचाऱ्यांकडून दि.14 मार्च 2023 केलेल्या संपामध्ये नमुद प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनांकडून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे . यांमध्ये आश्वासित प्रगती योजना , असुधारित वेतनश्रेणीमध्ये सुधारणा ,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न ,केंद्र सरकारप्रमाणे वाढीव वेतन / भत्ते लागु करण्यात यावे , तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे असे अनेक मागण्या या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला सादर केले आहेत .
केंद्र सरकारने त्याचबरोबर देशातील तब्बल 25 राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय ( Retirement Age ) 58 वर्षावरुन वाढवून 60 वर्षे करण्यात आले आहेत . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी सेवेंमध्ये 02 वर्षांची अतिरिक्त सेवा लाभ मिळावी याकरीता राज्य शासनांस वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना 4% DA वाढीची अधिसूचना !
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत राज्य शासनांकडून सकारात्मक भुमिका घेतली जात आहे , कारण तज्ञांच्या मते जुनी पेन्शन योजना लागु केल्यास , सेवानिवृत्तीचे वय वाढविणे राज्य सरकारच्या हिताचे असून , यामुळे राज्य शासनांच्या तिजोरीमध्ये दरवर्षी 4 हजार कोटी रुपये वाचणार आहेत .ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आणखीण 02 वर्षे सेवेत रहावे लागेल .म्हणजेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास राज्य सरकारचे व कर्मचाऱ्यांचाही फायदा होणार असल्याची बाब तज्ञांकडून नमुद करण्यात आलेली आहे .
राज्य शासनांकडून जुनी पेन्शनवर तोडगा काढण्यासाठी गठित समितीमध्ये यावर सकारात्मक निर्णय होवू शकतो . सदर गठीत समितीने राज्य कर्मचारी संघटनांकडून तसेच तज्ञांकडून आपले मत मागविण्यात आले होते , यामध्ये तज्ञांकडून मांडलेल्या मतानुसार जुनी पेन्शन लागु करावयाची असल्यास , सेवानिवृत्तीचे वय वाढविणे देखिल राज्य सरकारच्या हिताचे आहे , असे मत व्यक्त करण्यात आले आहेत .
शासकीय कर्मचारी विषयक , नोकर पदभरती विषयक तसेच इतर घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !