लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात येणार आहेत , ज्यामुळे राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त शासन सेवेचे लाभ मिळणार आहे . या विषयावर राज्य पातळीवर बैठक आयोजित करण्यात आलेली होती , या बैठकींमध्ये घेण्यात आलेले महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींबाबत , राज्य शासनांच्या मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक दिनांक 22.06.2023 रोजी संपन्न झालेली आहे . या बैठकींमध्ये जुनी पेन्शन योजनासह , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , सेवानिवृत्ती उपदानाची रक्कमेंमध्ये केंद्र सरकारप्रमाणे करणेबाबत अशा विविध प्रलंबित माणगीवर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे कुटंबनिवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन तसेच मृत्यु नि उपदान लागु करण्यात आलेले आहेत . त्याच प्रमाणे केंद्र सरकारने सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ केल्याप्रमाणे राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांची वाढ करणेबाबतच्या मुद्द्यावर चर्चा केली असता , मा.मुख्य सचिव यांनी स्पष्ट केले आहे कि , राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य 25 राज्याप्रमाणे 60 वर्षे करणेबाबत राज्य शासनांकडून प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल .
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनांच्या मागणीनंतर सर्वात मोठी दुसरी मागणी म्हणजे , सेवानिवृत्तीचे वय केंद्र व इतर 25 राज्य सरकारने लागु केल्याप्रमाणे 60 वर्षे करण्यात यावी . याबाबत राज्य सरकार देखिल सकारात्मक असल्याचे दिसून येत आहेत .कारण राज्य शासन सेवेंमध्ये अनेक पदे अद्याप रिक्त आहेत यामुळे सदर पदांवर नव्याने पदभरती करणे अथवा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणे हा पर्याय राज्य सरकारकडे आहे .

नुकतेच राज्य सरकारकडून सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे , सदर निवृत्त शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात येत आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !