Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Year News ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणेबाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण आनंदाची अपडेट समोर येत आहे . राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासोबत झालेल्या चर्चेदरम्यान ही महत्वपुर्ण माहिती दिली आहे .
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघ ही राज्यातील कर्मचारी संघटनांमध्ये महत्वपुर्ण अग्रिणी संघटना आहे . सदर संघटनांची नुकतेच एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली आहे . सदर बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे करणेबाबतचा मुद्दा चर्चिला गेला . यामुळे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करणेबाबत राज्य सरकारकडून लवकरच उचित / दिलासादायक निर्णय घेतला जाईल .
येत्या 14 डिसेंबर 2023 पासुन राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता बेमुदत संप करणार आहेत . या संपामध्ये राज्यातील राजपत्रित अधिकारी देखिल सहभागी होणार आहेत याकरीता राजपत्रित अधिकाऱ्यांनी 14 डिसेंबर रोजी सामुहिक एक दिवसीय रजा आंदोलन पुकारणार आहेत , यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री यांच्या सोबत राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे .
सदर बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सह सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , महत्वपुर्ण चर्चा करण्यात येणार आहेत .यामुळे सदर बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबत मोठा निर्णय घेण्याची मोठी शक्यता आहे .
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 2 वर्षांनी वाढविल्याने , सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे झाले आहेत , त्याच पार्श्वभुमीवर राज्यातील वर्ग क , ब आणि अ संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी राज्यातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.