Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee retirement age 60 years demand new update ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षे वाढवून 60 वर्षे करणे बाबतचा मुद्दा पुन्हा एकदा रिंगणात आला आहे . सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विद्यमान नवीन सरकारकडून , सकारात्मक निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून होत आहे .
राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाल्याने , कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर निर्णय घेण्यात येणार आहेत जसे की महायुतीचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार , सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात दोन वर्षाची वाढ करण्याच्या निर्णयास सकारात्मकता दर्शविण्यात आलेली होती .
त्याचबरोबर राज्य कर्मचारी वेळोवेळी निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याचा मुद्दा अधोरेखित करीत असतात . तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून पुन्हा एकदा निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी विद्यमान नवीन सरकारकडे केली आहे . सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची मोठ्या संख्येने सत्ता स्थापन झाल्याने , काही निर्णय एकहाती घेतले जातील , या अपेक्षेने कर्मचाऱ्यांकडून विद्यमान सरकारकडे सदर मागणी बाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .
निवृत्तीच्या वय वाढीकरिता विरोध कोणाचा : कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यास , स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शविला जात आहे . याशिवाय काही आमदारांकडून देखील सदर निर्णयाचा विरोध दर्शवल्याने , अद्याप पर्यंत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय झालेला नाही .
देशामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहे . या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वयात वाढ व्हावी , अशी मागणी वेळोवेळी कर्मचाऱ्यांकडून होत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.