लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी सेवेत राहण्याची पात्रपात्रता आजमविण्यासाठी राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दिनांक 27 जुन 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयांनुसार अकार्यक्षम तसेच संशयास्पद ससोटी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्यात येणार आहेत , याकरीता काही तरतुदी नमुद करण्यात आलेल्या आहेत .
संवर्ग अ , ब , क व ड मधी अधिकारी / कर्मचारी व विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील धर्मादाय आयुक्त महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त तसेच निंबंधक , भागीदारी संस्था नियंत्राखालील अधिकारी कर्मचाऱ्यांना देखिल सदर शासन निर्णयातील तरतुदी लागु करण्यात आलेल्या आहेत .यांमध्ये गट अ आणि ब राजपत्रित अधिकााऱ्यांसाठी वयाच्या 35 व्या वर्षापुर्वी नियुक्त झालेले अधिकाऱ्यांना 50 वर्षे पुर्ण होतेवेळी पुनर्विलोकन करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
तर गट ब ( अराजपत्रित ) , क आणि गड ड च्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाच्या 55 व्या वर्षी किंवा त्यांच्या शासन सेवेच्या 30 वर्षे पुर्ण होईल यापैकी जे पहिले घडेल त्या वेळी पुनर्विलोकन करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये गट अ गट ब ( रापत्रित / अराजपत्रित ) अधिकारी आणि गट क कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शारिरीक क्षमता / प्रकृतीमान , निर्विवाद सचोटी व चांगल्यापेक्षा कमी नाही असा गोपनिय अभिलेख ( सन 2017-18 पासुनच्य कार्यमुल्यमापन अहवालाचे गुणांकन 4 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे ) असे निकष शासन सेवेत पुढे सुरु ठेवण्यासाठी असणार आहेत .
तर गट ड संवर्गातील कर्मचारी वर्गांसाठी शारिरिक क्षमता / प्रकृतिमान , निर्विवाद सचोटी व नस्तीमधील अभिप्राय ( गोपनिय अभिलेख ) असे निकष शासन सेवेत पुढे सुरु ठेवण्याकरीता असेण आवश्यक असणार आहेत .
सदर पुनर्विलोकन करणे संदर्भात राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !