Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee related vidheyak] राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरुवात होणार आहे . या अधिवेशनामध्ये सरकारकडून 20 विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .
या विधेयकामध्ये विविध विषयावर चर्चा केली जाणार आहे , यामध्ये विद्यमान सरकार ईव्हीएम सरकार आहे पण या ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फोर मॅग्नेटिक महाराष्ट्र अशा प्रकारचा असणार आहे . महाराष्ट्र हे मॅग्नेटिक महाराष्ट्र घडविण्याकरिता राज्याचे मंत्रिमंडळ पुढील कामकाज करणार असल्याचे , मा. मुख्यमंत्री यांनी स्पष्ट करण्यात आले आहे .
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम संदर्भात विधेयक : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम त्याचबरोबर शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 सामान्य प्रशासन विभाग अध्यादेश क्रमांक 06 चे रूपांतरीत विधेयक सर्वसाधारण बदल्याच्या कालावधी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची तरतूद सदर विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे .
याशिवाय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे . यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित महागाई भत्ता (DA) याशिवाय वेतन त्रुटी निवारण समिती अहवाल अशा प्रकारचे प्रलंबित प्रश्न ऐनवेळी उपस्थित केल्यास , त्यावर चर्चा केली जाणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.