राज्य कर्मचारी , बँक /शाळा / महाविद्यालयांसाठी अत्यंत महत्वपुर्ण सन 2024 मधील सार्वजनिक सुट्या जाहीर ,शासन राजपत्र निर्गमित दि.10.11.2023

Spread the love

Live marathipepra संगिता पवार प्रतिनिधी [ Public Holiday 2024 Shasn Rajapatra ] : राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच बँका / शाळा / महाविद्यालयांसाठी अत्यंत महत्वपुर्ण सन 2024 साठीच्या सार्वजनिक सुट्या यादी जाहीर करण्यात आलेली आहेत , या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून अधिकृत्त शासन राजपत्र दिनांक 10.11.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

दरवर्षी माहे  नोव्हेंबर महिन्यांत राज्यातील आगामी वर्षाकरीताच्या सार्वजनिक सुट्यांच्या यादी सामान्य प्रशासन विभागांकडून निर्गमित करण्यात येतात , या संदर्भात अधिकृत्त शासन राजपत्र निर्गमित करण्यात येत असतो . सदर शासन राजपत्रनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना तसेच शासकीय कार्यालयांसाठी , बँका , शाळा , महाविद्यालयांसाठी सार्वजनिक रित्या सुट्या जाहीर करण्यात येतात .सन 2024 करीता जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..

माहे जानेवारी महिन्यांमध्ये दिनांक 26 जोनवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त वार शुक्रवार रोजी माहे जानेवारी महिन्यांतील एकमेव सार्वजनिक सुट्टी आहे .तर माहे फेब्रूवारी 2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2024 वार सोमवार रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .तर महाशिवरात्री सणानिमित्त दिनांक 08 मार्च वार शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर आहे .

होळी निमित्त 25 मार्च वार सोमवार , गुड फ्रायडे निमित्त दिनांक 29 मार्च वार शुक्रवार , गुढीपाडवा निमित्त 09 एप्रिल वार मंगळवार रोजी तर रमझान निमित्त दिनांक 11 एप्रिल 2024 वार गुरुवार तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिनांक 14 एप्रिल वार रविवार तर रामनवमी निमित्त दि 17 एप्रिल तर महावीर जन्म कल्याणक निमित्त 21 एप्रिल वार रविवार तर महाराष्ट्र दिन निमित्त दिनांक 01 मे वार बुधवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

बुद्ध पौर्णिमा निमित्त दि.23 मे तर बकरी ईद निमित्त 17 जुन तर मोहरम निमित्त दिनांक 17 जुलै तर स्वातंत्र दिनानिमित्त / पारशी नववर्ष निमित्त निमित्त 15 ऑगस्ट , रोजी तर गणेश चतुर्थी निमित्त दि.17 सप्टेंबर , तर ईद – ए – मिलाद निमित्त दि.16 सप्टेंबर तर महात्मा गांधी जयंती निमित्त दि.02 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

सविस्तर सार्वजनिक सुट्टी यादी शासन राजपत्र पाहा

तर दसरा सणानिमित्त दिनांक 12 ऑक्टोंबर 2024 , दिवाळी अमावस ( लक्ष्मीपुजन ) निमित्त दि.01 नोव्हेंबर 2024 तर दिवाळी ( बलिप्रतिपदा ) निमित्त दिनांक 02 नोव्हेंबर 2024 तर गुरुनानक जयंती निमित्त दिनांक 15 नोव्हेंबर 2024 तर ख्रिसमस दिनानिमित्त दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहेत .तसेच दिनांक 03 नोव्हेंबर 2024 रोजी वार रविवार रोजी भाऊबीज निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

बँकांना आपले वार्षिक लेखे पुर्ण करता येण्यासाठी केवळ बँकासाठी दिनांक 01 एप्रिल 2024 वार सोमवार रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

या संदर्भात , सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी बाबतचा अधिकृत्त शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन राजपत्र पाहा सविस्तर

Leave a Comment