मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रियेस विलंब न लावता तात्काळ राबविणेबाबत राज्य शासनांच्या उप सचिव ( कार्यासन आस्थापन ) विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.15.जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .
राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या पदोन्नतीबाबत मा.मंत्री ( शालेय शिक्षण ) महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.14.06.2023 रोजी बैठक संपन्न झालेली आहे . त्यानुषंगाने राज्यातील जिल्हा परिषद अंतर्ग कार्यरत शिक्षक संवर्गाची विविध टप्प्यातील पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहेत .
यास्तव मा.मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक संवर्गाच्या त्याचबरार गामविकास विभागांकडून दि.10.06.2014 रोजी निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय दि.01.12.2022 रोजीच्या निर्णयानुसार केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी , शिक्षण श्रेणी -2 संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
तसेच त्यानुसार तात्काळ पदोन्नतीची कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य शासनास सादर करण्यात यावा , असे आदेश राज्याचे उपसचिव पो.द.देशमुख यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत .या पदोन्नती संदर्भात राज्य शासनांकडून दि.15.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !