Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee pramotion imp paripatrak dated 02 july 2024 ] : राज्य शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांतुन विज्ञान व गणित विषयाचे विषय शिक्षक पदावर पदोन्नती देणेबाबत , प्रक्रिया राबविण्याबाबत , राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 02 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागाच्या दि.07.02.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच मा.श्री.संजय केळकर आमदार विधानसभा यांच्या दिनांक 11 जुन 2024 रोजीच्या पत्र , श्री.राजेश सुर्वे राज्याध्यक्ष , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक या संदर्भाधिन पत्रांनुसार , राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा यांच्याप्रति..
शिक्षण संचालक ( प्राथमिक ) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने सदर शासन परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे . सदर पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये विज्ञान / गणित विषयाचे शिक्षक पदे रिक्त आहेत .
अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी आधारे जिल्हा परिषदांतर्गत पदभरतीपुर्वी सध्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत सेवाज्येष्ठ शिक्षकांमधून गुणवत्तेनुसार , इयत्ता 6 वी व इ. 8 वी करीता विज्ञान / गणित या विषय शिक्षकांसाठी रिक्त पदांच्या मर्यादेत पदोन्नती प्रक्रिया शासन नियमानुसार राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 02 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.