Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pramotion Highcourt Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भात उच्च न्यायालयाकडून अत्यंत महत्वपुर्ण निर्णय देण्यात आला आहे , यामुळे राज्यातील शिक्षकांच्या बढतीचा मार्ग मोकळा झालेला आहे , या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्राथमिक शिक्षक या पदांवरुन चक्क माध्यमिक शिक्षक या पदावर पदोन्नती मिळणार आहे . या संदर्भात उच्च न्यायालयांकडून अधिकृत्त निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर रोजी देण्यात आला असून , दिनांक 01 डिसेंबर पुर्वी पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची ज्येष्ठता यादी न्यायालयांमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षक म्हणून पदोन्नतीचे मार्ग आतापर्यंत बंद होते , मात्र महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात रिट पिटीशन दाखल करण्यात आलेले होते . यांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत बी.एड अर्हता धारक प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शिक्षक सेवाजेष्ठता यादीत समाविष्ठ करण्याची मागणी करण्यात आलेली होती . यावर दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने राज्यातील जिल्हा परिषदेचे अर्हताधारक प्राथमिक शिक्षक हे माध्यमिक शिक्षक पदोन्नतीस पात्र असणे बाबत आदेश देण्यात आलेले आहेत .
यामुळे आता माध्यमिक शिक्षक या पदावर पदोन्नतीसाठीची सुधारित यादी दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत तयार करुन दिनांक 01 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयांमध्ये सादर करण्यात आदेश देण्यात आलेले होते . या सुधारित सेवाज्येष्ठता यादींमध्ये अर्हताधारक प्राथमिक शिक्षकांचा देखिल समावेश करण्यात आलेला आहे .
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे माध्यमिक शिक्षक या पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे .सदरची पदोन्नती ही महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा ( सेवाप्रवेश ) नियम 1967 मधील नियम 50 खंड 4 परिशिष्ठ 4 भाग 2 नुसार करण्यात येणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.