Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Ashwasit Pragati Yojana Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 14 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील खाजगी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक , उच्च माध्यमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु नाही , शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना फरकासहित 12 वर्षाच्या नंतर देय असणारी कालबद्ध पदोन्नती योजना दिनांक 30 एप्रिल 1998 च्या दिनांक 23.07.1998 च्या निर्णयानुसार दिनांक 01 ऑक्टोंबर 1994 पासून मंत्रीमंडळाच्या मंजूरीनंतर लागु करण्यात आलेली आहे .
शासन मान्यताप्राप्त खाजगी शाळामधील कनिष्ठ लिपिक , शिपाई या पदावर काम करीत असलेल्या सर्वश्री हिरालाल पिपारिये व इतर 10 यांनी मुंबई उच्च न्यायालय , औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका क्र.8985/2013 दाखल केली होती , सदर न्यायालयीन प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने दिनांक 19.08.2014 रोजी राज्यातील खाजगी संस्थांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सत्वर करण्याचे आदेश दिले आहेत .
मा.मंत्रीमंडळाच्या दिनांक 11 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक , उच्च प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयास अनुसरुन शालेय शिक्षण विभाग मार्फत येणाऱ्या राज्यातील खाजगी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक , उच्च प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागु करण्यास सदर निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहेत . सदरची आश्वासित प्रगती योजना ही पुर्वलक्षी प्रभावाने लागु राहणार नाही त्याचबरोबर थकबाकी देखिल देय होणार नाही असा निर्णय देण्यात आलेला आहे .
या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 14 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.