Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee poshakh Bhatta & dhulai Bhatta shasan nirnay ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी पोशाख भत्ता व धुलाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उप विभाग अंतर्गत राजशिष्टाचार विषयक कामकाज हाताळणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना प्रतिवर्ष पोशाख भत्ता तसेच अन्य सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना 02 वर्षातुन एकदा पोशाख भत्ता व पोशाख निटनेटका ठेवण्याकरीता प्रतिमहा धुलाई भत्ता पुढील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे मंजुर करण्यात आला आहे .

पदनामपोशाख भत्ताधुलाई भत्ता (प्रतिमहा)
मुख्य सचिव30,000/-
अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी30,000/-
सहसचिव / उपसचिव20,000/-1,500/-
अवर सचिव16,000/-1,200/-
कक्ष अधिकारी / विशेष राजशिष्टाचार अधिकारी12,000/-1,000/-
सहायक कक्ष अधिकारी8,000/-750/-
लिपिक – टंकलेखक6,000/-650/-
उच्चश्रेणी लघुलेखक6,000/-650/-
शिपाई / रायडर5,000/-350/-

पुरुष राज‍िशष्टाचार अधिकारी वर्गाकरीता पोशाख  : वरील तक्त्यातील मुख्य सचिव ते सहायक कक्ष अधिकारी पदांपर्यंतच्या अधिकाऱ्यांना लाउंज सुट / जोधपुरी सूट अथवा ब्लेझर इतर आवश्यक पोशाख साहित्य ..

लिपिक – टंकलेखक  व उच्चश्रेणी लघुलेखक पुरुष अधिकारी / कर्मचारी करीता पोशाख : ब्लेझर व इतर आवश्यक पोशाख साहित्य ..

शिपाई /रायडर पुरुष कर्मचाऱ्यांकरीता पोशाख : सफारी सुट व इतर आवश्यक पोशाख साहित्य ..

स्त्री राजशिष्टाचार अधिकारी वर्गाकरीता पोशाख : समारंभीय प्रसंगाकरीता साजेशी सिल्कची साडी व इतर आवश्यक पोशाख साहित्य , समारंभीय प्रसंगाकरीता एक ब्लेझर व इतर आवश्यक पोशाख ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *