Live Marathipepar संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचारी / पेन्शनधारकांना दसरा सणापुर्वीच केंद्र सरकारप्रमाणे वाढीव महागाई भत्ताचा लाभ प्राप्त होणार आहे . दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी / पेन्शनधारकांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबत , मोठा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे .
केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के डी.ए वाढ : केंद्र सरकारने माहे जुलै महिन्यांपासून महागाई भत्तांमध्ये 4 टक्यांची वाढ लागु करण्यात आली आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 42 टक्के वरुन 46 टक्के पर्यंत पोहोचला आहे . सदर वाढीव महागाई भत्याचा प्रत्यक्ष लाभ हा माहे ऑक्टोंबर 2023 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत देण्यात येणार आहेत .
राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाची भेट म्हणून केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के डी.ए चा लाभ लागु करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होणार असल्याची मोठी शक्यता वर्तविली जात आहे .केंद्र सरकारने डी.ए वाढ बाबतचा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरु करण्यात आलेली आहे .
माहे ऑक्टोंबर महिन्याच्या वेतनासोबत , दिवाळी सण अग्रिम तसेच वाढीव महागाई भत्ता प्राप्त होणार असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणांमध्ये मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .
केंद्र सरकारने डी.ए वाढ लागु केल्यानंतर राज्य शासनांकडून राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए वाढ लागु करण्यास नेहमीच विलंब होत असतो , परंतु पुढील महिन्यात दिवाळी सण असल्याने , या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 4 टक्के डी.ए वाढ बाबतचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.