Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee vadhiv DA Paid With November Month Payment / Pension ] : राज्यातील शासकीय कर्मचारी , निमशासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे . माहे जुलै महिन्यांपासून वाढीव डी.ए नोव्हेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहेत .
केंद्र सरकारने मागील महिन्यात डी.ए वाढीचा अधिकृत्त कार्यालयीन ज्ञापन निर्गमित केल्याने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑक्टोंबर महिन्यांपासून डी.ए चा प्रत्यक्ष लाभ लागु करण्यात आला . परंतु राज्य शासनांकडून अद्याप शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही , परंतु राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून या बाबत अधिकृत्त प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्यमंत्र्याच्या अनुमतीसाठी पाठविण्यात आले असल्याची बातमी समोर येत आहे .
डी.ए मध्ये 4 टक्के वाढ : केंद्र सरकारप्रमाणे डी.ए मध्ये 4 टक्क्यांची वाढ लागु करण्यात येणार असल्याने केंद्रीय कर्मचारी / पेन्शनधारकांप्रमाणे माहे जुलै 2023 पासून राज्यातील कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ प्राप्त होणार आहे .
डी.ए थकबाकी : सदरचा वाढीव महागाई भत्ता हा माहे जुलै 2023 पासूनच लागु करण्यात येणार असल्याने , जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर , ऑक्टोंबर या चार महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम ही नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे .
डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय कधी निघणार : राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढी बाबतचा अधिकृत्त शासन निर्णय हा या महिन्यांतील शेवटच्या आठवड्यात निर्गमित करण्यात येणार आहे .ज्यामुळे कार्यालय प्रमुखांना पुढील वेतनासोबत डी.ए वाढ लावून वेतन बिल तयार करता येणार आहेत .
पेन्शनधारकांनी या वर्षातील जीवन प्रमाणपत्र 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करणे अनिवार्य असणार आहेत , जीवन प्रमाणपत्र विहीत कालावधीमध्ये सादर न केल्यास , पेन्शनधारकांची पुढील महिन्यांपासून पेन्शन बंद होईल .यामुळे पेन्शन धारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याकडे दुर्लक्ष करु नयेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.