Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट राज्यातील राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत राज्य शासनांकडून अद्याप सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही . यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांकडून आरपारची लढाई म्हणजेच पेन्शन शंखनाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . ज्यामुळे सरकार पुणेपणे डोळे उघडणार आहेत .

जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरता आता देशातील NPS धारक कर्मचारी एकवटले आहेत , दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी देशभरातील कर्मचारी जुनी पेन्शन लागु करण्यात यावी या प्रमुख मागणीकरीता देशाची राजधानी येथे मा.विजयकुमार बंधूजी यांच्या नेतृत्वात एकत्र येवून पेन्शन शंखनाद रॅलीमध्ये सहभाग घेणार आहेत . या रॅलीस देशभरातुन कर्मचारी उपस्थित राहणार असल्याने , आंदोलनाची तिव्रता अधिक असणार आहे .

यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाच्या वतीने सक्रिय सहभाग घेण्यात येणार असून संघटनेची महत्वाची कामे म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेमध्ये होण्यात महत्वाची भुमिका , तसेच अशंदान पेन्शन योजनेच्या कपात रकमेच्या हिशोब मिळवत अचूक रकमा NPS मध्ये वर्ग करणे , तसेच सातवा वेतन आयोग मोफत वेतन निश्चिती एक्सेल टूल करणे .

हे पण वाचा : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा निर्णय हा केंद्र सरकारच्या धर्तीवरच ! कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप !

तसेच 23/10 शासन आदेशानंतर राज्यात प्रथम वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुर करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा करणे , सातवा वेतन आयोग जुलै विकल्प निवडीचा अधिकार मिळण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा करणे , राज्यात सर्वात गतीने शिक्षण सेवक नियमितकरण व स्थायी आदेश देण्यात महत्वाची भुमिका मांडणे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच इतर पात्र , सेवानिवृत्त पेन्शनधारक / निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *