लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राष्ट्रीय निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे सन 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान / सेवा उपदान मंजुर करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक ग्राम विकास विभागांकडून दि.15 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना दि.31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दि.01 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन योजना आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन त्याचबरोबर राज्य शासन सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान तर सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यात आले आहेत .
राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत कार्यरत कर्मचारी हे निम-शासकीय कर्मचारी असल्याने वरील नमुद निवृत्तीवेतन व इतर लाभ प्रत्यक्ष लागु करण्यात येत नाहीत . यामुळे ग्राम विकास विभागांकडून दि.15 मे 2023 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करुन राज्यातील राज्यातील जिल्हा परिषदा मधील कर्मचाऱ्यांना , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मंजुर करण्यात येत आहे .
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% पार गेल्यास , लागू होणार नवा वेतन आयोग !
तर मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत राज्याचे कक्ष अधिकारी यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .शिवाय सदर लाभ राज्य शासनांच्या 20230403133330705 व 202304201602114305 या शासन निर्णयानुसार त्यातील नमुद तरतुदी विचारात घेवून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
शासकीय कर्मचारी विषयक , नोकर पदभरती तसेच इतर घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !