लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्य शासन सेवेतील NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची मोठी खुशखबर समोर आली आहे राज्यातील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजुर करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.14.06.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आलेली आहे , या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दि.07.07.2007 च्या शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे .राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक / उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दि.29.11.2010 रोजीच्या शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे .
सविस्तर पेन्शन शासन निर्णय पाहा
सदर शासन निर्णयनुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा कर्मचाऱ्यांना ज्यांमध्ये शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान तर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांला रुग्ण्ता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागु करण्यात येत आहे .
तसेच सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लागु असणार आहे .त्याचबरोबर 100 टक्के अनुदानित शाळेतील सेवेतुन निवृत्त होणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागु करण्यात येत आहे .
शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून कुटुंबनिवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लागु करणेबाबत दि.14 जुन 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !