Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pending demands News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागण्या ह्या प्रलंबितच आहेत , यापैकी काही मागण्यांवर राज्य सरकारकडून सकारात्मक धोरण निश्चित करण्यात येत आहेत . निवडणूकीची पार्श्वभूमी लक्षात घेवून राज्य शासनांकडून राज्य कर्मचाऱ्यांना लाभ दिले जात आहेत .

प्रस्तावित महागाई भत्ता लाभ : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून केंद्र सरकारप्रमाणे 4 टक्के वाढीव महागाई भत्ता माहे जुलै महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येईल , कारण माहे जून 2024 पर्यंत राज्यात लोकसभा निवडणूका आचारसंहिता असणार आहे . म्हणून सदर डी.ए वाढीचा निर्णय रखडला आहे .

सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना : राज्य शासनांकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याची मोठी घोषणा  केली आहे , परंतु त्याबाबत अधिकृत्त अधिसूचना / शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले नाहीत , यामुळे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करणेबाबतचा अधिकृत्त निर्णय हा माहे नोव्हेंबर 2024 पुर्वी ( विधानसभा निवडणूका पुर्वी ) घेण्यात येईल .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे : राज्य शासन राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे होणेबाबत , प्रस्तावित मागणीवर सकारात्मक निर्णय विधानसभा निवडणूकापुर्वी होवू शकतो . याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागांकडून तयार करुन विधीमंडळाकडे सादर करण्यात आलेला होता , परंतु काही सदस्यांनी यास विरोध दर्शविल्याने , अद्याप विधीभवनांमध्ये सादर करण्यात आलेला नाही . परंतु कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेता याबाबत अधिकृत्त निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे .

घरभाडे भत्ता वाढ ( HRA ) : 7 व्या वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ता ( DA ) चे दर 50 पेक्षा अधिक झाल्यास , सुधारित घरभाडे भत्ता लागू करणे अपेक्षित आहे , सध्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने डी.ए वाढ लागू आहे , तर जुलै 2024 मध्ये परत डी.ए वाढ होईल , म्हणजेच डी.ए चे दर 50 टक्के पेक्षा अधिक होतील , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे लागु करण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *