Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ State Employee Payment Shasan Nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत पिकांची आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना ( आयसीएस ) आणि कृषी गणना या तीन 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत मंजूर पदांवर कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याबाबत , राज्य शासनांच्या कृषी , पशुसंवर्धन विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना , कृष्ज्ञी गणना आणि पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना ( आयसीएस ) योजना या तीन 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत मंजूर पदांवर कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनासाठी होणारा खर्च हा प्रस्तुत योजना अंतर्गत केंद्र शासनांकडून PFMS प्रणालीद्वारे आयुक्त ( कृषी ) यांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातुन समायोजनाने राज्य शासनाच्या लेखाशिर्षाखाली जमा करण्याच्या अटीस अधिन राहून पुढीलप्रमाणे योजनाचे नाव व लेखाशिर्ष निहाय उद्दिष्ट नमुद करण्यात आलेले आहेत .
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना , कृषी गणना आणि पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्यांची योजना या तीनही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजनामध्ये मंजुर पदांवर कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रस्तुत योजना अंतर्गत केंद्र शासनांकडून PFMS प्रणालीद्वारे आयुक्त यांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातुन समायोजनाने राज्य शासनाच्या 1601- केंद्र सरकारकडून सहायक अनुदाने , 06- केंद्र पुरस्कृत योजना , 101- केंद्रीय सहाय / हिस्सा , 09- कृषी , 09/08 – कृषी गणना व सांख्यिकीचा एकात्मिक प्रकल्प या लेखाशिर्षाखाली जमा करण्याची जबाबदार आयुक्त यांची असणार आहे .
या संदर्भात कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विका व मत्स्यव्यवसाय विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.