मराठी पेपर , संगीता पवार : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन त्याचबरोबर पेन्शन धारकांचे निवृत्ती वेतन संदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक 12 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद कडून दरमहा मागवण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्तीवेतनाबाबतची माहिती (अनुदान मागणी पत्र )शासनास दर महिन्याला उशिराने प्राप्त होते, यामुळे जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांचे नियमित वेतन व सेवानिवृत्ती वेतन विहित वेळेत त्यांच्या खात्यावर जमा होत नसल्याबाबतची तक्रारी राज्य शासनास दूरध्वनीद्वारे / निवेदनाद्वारे शासनाकडे येत आहेत .
तरी जिल्हा परिषदा कडून दरमहा मागवण्यात येणारी नियमित वेतन त्याचबरोबर निवृत्तीवेतनाची माहिती (अनुदान मागणी पत्र) राज्य शासनास दर महिन्याला 20 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी . असे निर्देश सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राज्याचे उपसचिव तथा सहसंचालक यांच्याकडून परिपत्रक सादर करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : अखेर राज्यातील या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू ,राज्य शासनाचा मोठा निर्णय !
सदर शासन परिपत्रकामुळे राज्यातील अधिकारी /कर्मचाऱ्यांचे वेतन विलंबाने होत आहेत ,अशा कर्मचाऱ्यांचे वेतन आता विहित कालावधीमध्ये अदा करण्यात येणार आहेत . कारण राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषदा) सर्व यांना कळविण्यात आले आहे की , दरमहा नियमित वेतन त्याचबरोबर निवृत्तीवेतन सादर करण्यासाठी आवश्यक निधीची (मागणी पत्र) 20 तारखेच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . जेणेकरून कर्मचाऱ्यांचे वेतन / निवृत्तीवेतन विहित कालावधीमध्ये सादर करता येणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !