Live Marathipepar , प्रणिता पवार [ State Employee October Month Payment / Pension Big Update ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी / निमसरकारी ( जिल्हा परिषद ) कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे ऑक्टोंबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयक अदा करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे .
दिवाळीपुर्वीच वेतन / पेन्शन : पुढील महिन्यांत दिवाळी सण 10 नोव्हेंबर 2023 पासुन सुरुवात होत आहे , परंतु सणाच्या अगोदरची खरेदी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन / पेन्शन देयक विहीत वेळेत अदा होणे आवश्यक आहे . यासाठी राज्य प्रशासनांकडून माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन बिल विहीत कालावधीमध्ये सादर करण्याचे निर्देश लेखा विभागांकडून कार्यालय प्रमुखांना देण्यात आलेले आहेत .
सदर वेतन / पेन्शन देयक हे नोव्हेंबर महिन्यापुर्वीच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अदा करण्यासाठी प्रशासनांकडून वित्तीय यंत्रणा सज्ज करण्यात आलेले आहेत .वेतन / पेन्शन करीता आवश्यक निधीची मागणी कार्यालय प्रमुखांकडून विहीत काळात करणे आवश्यक असणार आहेत .
दिवाळी सण अग्रिम : दिवाळी सण अग्रिम अदा करण्यासाठी विविध कार्यालय प्रमुखांकडून अग्रिम बिल सादर करण्यात येत आहेत . ज्यांचे दिवाळी सण अग्रिम बिल सादर करण्यात आलेले आहेत , अशा कर्मचाऱ्यांचे दिवाळी सण अग्रिम हे दिवाळी सणापुर्वीच अदा करण्यात येईल , जेणेकरुन कर्मचाऱ्यांना दिवाळी सणांची आवश्यक खरेदी करता येणार आहेत .
प्रलंबित वेतनासाठी निधीची पुर्तता : एकीकडे दिवाळी सणांपुर्वीच ऑक्टोंबरचे वेतन / पेन्शन अदा करण्याची चर्चा सुरु असताना , दुसरीकडे अनेक कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर महिन्यातील वेतन / पेन्शन अद्याप अदा करण्यात आलेले नाहीत . यामुळे सदर प्रलंबित वेतनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी शिक्षक तसेच इतर कर्मचारी संघटनांकडून राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.