लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : पगारवाढ शासन निर्णय – महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांतील शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करणेबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून दि.15.05.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत चालविण्यात येणाऱ्या विभाभज प्रवर्गाच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा , विद्यानिकेतन तसेच उसतोड कामगारांच्या मुलां / मुलींसाठीच्या आश्रमशाळांमधील शिक्षण सेवकांच्या मानधनात शासन निर्णय , शालेय शिक्षण विभाग दि.07.02.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार वाढ करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहेत .
यांमध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना यापुर्वी 6000/- रुपये मानधन देण्यात येत होते ,यांमध्ये सुधारणा करुन आता 16,000/- मानधन करण्यात येत आहेत . तर माध्यमिक शिक्षण सेवकांना 8,000/-रुपये मानधन देण्यात येत होते ,यात आता सुधारणा करुन 18,000/- अशी वाढ लागु करण्यात आली आहे . तर उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना 9,000/- रुपये मानधन देण्यात येत होते , आता यात सुधारणा करुन प्रतिमहा 20,000/- रुपये करण्यात आलेले आहेत .
वरील नमुद सुधारित मानधन वाढ ही दि.01.01.2023 पासुन फरकासह लागु करण्याचा निर्णय सदर शासन निर्णान्वये घेण्यात आला आहे . या संदर्भातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
राज्य / केंद्र सरकारी कर्मचारी विषयक , नोकर भरती , योजना व देश -विदेश चालु घडामोडींच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !