Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Anudan Shasan Nirnay Dated 24.04.2024 ] : राज्यातील केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा ( प्राथमिक शिक्षण , माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्ष्ज्ञण ) उपयोजनेचा उर्वरित निधी वितरीत करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातुन केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनांकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीच्या प्रमाणात राज्य हिस्स्याची कमी वितरीत करण्यात आलेली रक्कम रुपये 32,92,11,406/- इतका निधी सर्वसाधारण शिक्षण , 01 प्राथमिक शिक्षण , 106 शिक्षक व इतर सेवा , समग्र शिक्षा अभियान ( सर्वसाधारण ) 31 सहाय्यक अनुदाने ( वेतनेतर ) या लेखाशिर्षाखाली राज्य प्रकल्प संचालक ..

समग्र शिक्षा , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चर्नी रोड मुंबई यांच्याकडे समग्र शिक्षा योजनांच्या अंमलबजावणीसाठी या आदेशान्वये सुपुर्त करण्यास मान्यता देण्यात येत आहेत . सदरचा निधी हा आहरीत करुन वितरीत करण्यासाठी अवर सचिव / कक्ष अधिकारी / शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय यांना आहरण व संवितरण अधिकारी तर सह / उप सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत .

तर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातुन आहरित करुन निधी समग्र शिक्षा यांच्या बँक खात्यात जमा करण्यातचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच सदरचा निधी वितरीत करताना अटी / शर्तीचे पालन करणे आवश्यक असणार असल्याचे सूचति करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *