Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee payment anudan shasan nirnay ] : राज्यातील अल्पसंख्याक आयोग अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे माहे डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमधील वेतन व वेतनावरील बाबीकरीता अनुदान उपलब्ध देण्यात आले असून , या संदर्भात अल्पसंख्याक विभाग मार्फत दिनांक 31.12.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार , महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण , 02 समाज कल्याण , 200 समाज कल्याण , 200 इतर कार्यक्रम , राज्य अल्पसंख्याक आयोग 2235 ए 249 , 36 सहायक अनुदाने या लेखाशिर्षा अंतर्गत एकुण 99,76,000/- रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आलेली आहे .
वित्त विभागाच्या दिनांक 25.07.2024 रोजीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सहायक अनुदाने या लेखाशिर्षाकरीता 70,82,930/- रुपये इतके अनुदान बीम्स प्रणालीवर उपलब्ध झाले आहेत . सदरच्या शासन निर्णयानुसार एकुण 55,86,530/- रुपये इतके अनुदान वितरीत करण्यात आले असून , सद्यस्थितीमध्ये , रुपये 14,96,400/- रुपये इतके अनुदान शिल्लक आहे .
त्यानुसार सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी नमुद केल्यानुसार मागणी बीम्स प्रणालीवर उपलब्ध निधीतून रुपये 14,96,400/- इतकी रक्कम अनुदान महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत .
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.