Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee payment and allowance paid imp shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते प्रदान करणे संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय (GR) वित्त विभागाकडून दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
वित्त विभागाच्या दिनांक 14 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की , शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता प्राधिकृत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन 2024-25 या वर्षासाठी यादी सुधारित करण्यात आली आहे .
यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम त्याचबरोबर नियमाकुल , व्यावसायिकता बाळगणाऱ्या याशिवाय इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका संदर्भात लेखापरीक्षण “अ” वर्ग असणाऱ्या 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सहकार , वस्त्रोद्योग व पणन विभागाकडून शिफारस करण्यात आली आहे .
यामध्ये ठाणे , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , अहमदनगर , पुणे, सातारा ,सांगली , कोल्हापूर ,लातूर , अकोला, भंडारा , चंद्रपूर, गडचिरोली ,गोंदिया या 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता आणि निवृत्तीवेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता तसेच सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकी करिता प्राधिकृत करणेस मान्यता प्रदान करण्यात येत आहे .
सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत सदर 15 बँकांनी वेतन व निवृत्ती वेतन प्रदानाकरिता शासनासोबत आवश्यक करार करणे अनिवार्य असणार आहे .
