Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment And Allowance Today IMP Shasan Nirnay ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते भागविण्यासाठी सन 2023-24 करीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
मा.मंत्रीमंडळाच्या दिनांक 31 मार्च 2022 रोजीच्या बैठकीमध्ये , राज्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनांकडून 100 टक्के राज्य योजना म्हणून पुढील पाच वर्षे म्हणजेच दिनांक 01 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 पर्यंत पुर्वीप्रमाणे सुरु ठेवण्याबाबत , निर्णय घेण्यात आलेला आहे . जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना करीता दिनांक 01 ए्प्रिल 2022 पासून 15 पदांऐवजी 08 पदे निश्चित आले असून , उर्वरित पदांवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा त्यांच्या मुळ आस्थापनेवर प्रत्याप्रित करण्याबाबत , निर्णय घेण्यात आलेला आहे .
सन 2023-24 करीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मधील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व वितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय विवरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्याची बाबत राज्य शासनांच्या होती . यानुसार सदर शासन निर्णयानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – प्रशासन मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरीता आवश्यक प्रतिमाह वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेवून सन 2023-24 करीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन / भत्ते अदा करण्याकरीता रुपये 9,54,00,000/- इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पिय विवरण प्रणालीवर खालील विवरण पत्रांनुसार वितरणी करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.