शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन / भत्यांचे तर पेन्शनधारकांचे पेन्शन प्रदान करण्यासाठी वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.01.12.2023

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment & Allowance Paid Shasan Nirnay ] : शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन 2023-24 या वर्षाची यादी सुधारित करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेवून आर्थिकदृष्ट्या सक्षम व नियमानुकुल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर निकष पुर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकासंदर्भात सहकार , वस्त्रोद्योग व पणन विभागाने केलेल्या शिफारशीस अनुसरुन सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी राज्यातील 14 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची यादी शासन निर्णय दि.17.10.2023 मध्ये नमुद करण्यात आलेली आहे .

दि.19 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वित्‍ त विभागाच्या दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार विहीत केलेले निकष शिथिल करुन सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या यादीमध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश करण्याचे निदेश देण्यात आलेले आहेत .या पार्श्वभुमीवर दिनांक 17.10.2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत .

सदर नमुद वस्तुस्थितीस अनुसरुन एक वेळची विशेष बाब म्हणून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेचा समावेश सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी वित्त विभाग दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या यादीमध्ये करण्यास शासन पुरकपत्रानुसार मान्यता प्रदान करण्यात येत आहे .

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सन 2023-24 या वर्षाकरीता शासकीय बँकींग व्यवहार करण्यास तसेच सार्वजनिक उपक्रम महामंडळ याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी मान्यता प्रदान करण्यात ये आहेत . सदर शासन पुरक पत्र निर्गमित झाल्यापासून एक महिन्यांच्या आत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वेतन व निवृत्तीवेतन प्रदानाकरीता शासनासोबत आवश्यक करार करणे आवश्यक असणार आहेत .

या संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment