Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Shasan Nirnay ] : प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्यांचे प्रदान करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभााग मार्फत दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश वित्त विभागाच्या दिनांक 01.12.2023 रोजीच्या शासन पुरक पत्रानुसार , दि.13.08.2020 च्या शासन निर्णयानुसार विहीत केलेले निकष शिथिल करुन सन 2023-24 या वित्तीय वर्षाकरीता एक वेळची विशेष बाब म्हणून बँकिंग व्यवहार करण्यास पात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यादीमध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे . या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागांकडून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .
बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत अदा करण्याबाबत दिनांक 28 मार्च 2018 व दिनांक 04 एप्रिल 2018 शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात येत आहेत . बृहन्मुंबईतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दरमहाचे वेतन वितरीत करण्यासाठी अधिक्षक , वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक ( यांमध्ये दक्षिण / उत्तर / पश्चिम ) यांचे मेन पुल खाते एक वेळची विशेष बाब म्हणून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित मध्ये उघडण्यास सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी मान्यता देण्यात येत आहेत .
बृहन्मुंबईतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट 2005 व दिनांक 07 एप्रिल 2008 नुसार विहीत केलेली कार्यपद्धती व इतर अटी व शर्ती जशाच्या तशा लागु असणार आहेत . सदर अटी व शर्तींची काटेकोरपणे अंमलबजावणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
विभागीय शिक्षण उपसंचालक , मुंबई विभाग मुंबई यानी याबाबत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी आवश्यक तो करारनामा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच याबाबत शिक्षण निरीक्षक दक्षिण / उत्तर / पश्चिम यांचे मेन पुल खाते ( पार्कींग खाते ) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तात्काळ उघडण्यात यावेत , व याबाबत आवश्यक संनियत्रण करण्याची कार्यवाही आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीप्रमाणे पाहुयात ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.