Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee 7 th pay Commission installment Manjuri ] : सध्या राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु आहे , या अधिवेशनांमध्ये राज्याचे हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले जात आहेत , तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात येत आहेत .
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला , दुसरा , तिसरा व चौथा हप्ता अदा करणेबाबत या पुर्वीच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेल आहेत , परंतु निधी अभावी राज्यातील काही कर्मचाऱ्यांना तिसरा व चौथा हप्ता अदा करणे बाकी आहेत . या करीता कर्मचाऱ्यांकडून उर्वरित हप्ते अदा करणेबाबत निधीची मागणी करण्यात आलेली होती . या मागणीनुसार अधिवेशांत राज्य शासनांकडून भरिव निधीची उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे .
सातवा वेतन आयोग फरक थकबाकीची रक्कम एकुण पाच हप्त्यात देण्याचा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे , यापैकी चार हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत . परंतु राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तिसरा व चौथा हप्ता प्रदान करणे अद्याप बाकी होते . याकरीता पुढीलप्रमाणे निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर पदांचे वेतन , निवृत्ती वेतन ( Pension ) , सातव्या वेतन आयोगाच्या तिसरा व चौथा हप्ता प्रदान करण्यासाठी रुपये 2728,41,26,000/- इतक्या अतिरिक्त निधीची तरतुद करण्यात आलेली आहे .त्याचबरोबर राज्यातील वेतन करीता सहाय्यक अनुदाने ( वेतन ) या लेखाशिर्ष खाली 2,53,36,84/- इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर मागणीनुसार अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या अघडणे ( अनिवार्य ) , सहायक अनुदाने ( वेतन ) या लेखाशिर्ष खाली 1,65,61,73/- इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
या संदर्भात अधिवेशात मंजुरी देण्यात आलेले निधी पुर्तता माहिती पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.