राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित लाभ देण्यास देणेबाबत आजचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.19.06.2023

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : सातव्या वेतन आयोगानुसार सेवानिृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्यास मुदतवाढ देणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दिनांक 19 जुन 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .वित्त विभागाकडून या संदर्भात दि.19.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

दिनांक 01.01.2016 ते दि.31.12.2018 या कालावधीमध्ये जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत आणि यापुर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ ‍निवृत्तीवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ घेतलेला आहे , अशा निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 05.02.2021 च्या शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगानुसार होणाऱ्या मूळ निवृत्तीवेतनावर सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देय करण्यात आला आहे .

दिनांक 01.01.2016 ते दि.31.12.2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित अंशराशीकरणाचे लाभ देण्याची कार्यवाही अनेक प्रकरणांमध्ये प्रलंबित असून त्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यास लागणारा कालावधी विचारात घेता 7 वा वेतन आयोगानुसार सुधारित न झालेले अंशराशीकरणाचे प्रस्ताव सादर करण्यास दिनांक 31.12.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .सदर कालावधीमध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांची असणार आहे .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोगा आली आत्ताची मोठी अपडेट !

ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागु केलेली आहे , अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना सदर परिपत्रकातील फेरफारांसह लागु असणार आहेत .त्याचबरोबर महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे कि , सदर निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागु असणार आहे .

या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दि.19 जून 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment