Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee pay Commission Installment , other bill ] : राज्यातील खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद , इतर स्थानिक स्वराज्य संस्था , कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकित देयके , सातवा वेतन आयोगाचे हप्ते व इतर देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेबाबत , राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांकडून दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार वरील नमुद कर्मचाऱ्यांचे थकीत देयके – खाजगी शाळांच्याबाबत संचालनालय स्तरावरुन ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे , मंजूरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षात थकित देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे , त्यानुसार आवक ज्येष्ठता नुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचा दुसरा , तिसरा व चौथा हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणाली द्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . यांमध्ये नमुद लेखाशिर्ष मधून सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचा 1 , 2 , 3 राहिला असल्यास आणि चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
अंशत : अनुदानित शाळेतील 20 टक्के , 40 टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षांमध्ये सदर टप्पा वाढ झाली व या वाढीव टप्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास , अदा देय फरक ऑनलाईन मधून अदा करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहीत धरुन हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे , त्यानुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सन 2023-24 याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे , सदर देयके ऑनलाईन काढण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .दिनांक 04.01.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्यांचे प्रदान स्टेट बैंक ऑफ इंडिया सीएमपी ई-कुबेर प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करणेबाबत , योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांकडून दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.