Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State employee paribhashit Pension GR ] : सन 2023-24 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 28 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

जिल्हा परिषदा , मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयामधील 100 टक्के अनुदानित पदावरील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनांची कार्यपद्धती ही शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 29.11.2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार विषद करण्यात आलेली आहे . सदर योजाकरीता राज्य शासनाचा हिस्सा  व व्याजाकरीता शासन निर्णय 18.02.2016 रोजीच्या नुसार लेखाशिर्ष उघडण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदरच्या शासन निर्णयानुसार , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी खालीलप्रमाणे मंजूर अर्थसंकल्पीय तरतुद बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहेत . योजना , लेखाशिर्ष व सन 2023-24 करीता मंजूर तरतुद व सन 2023-24 मध्ये वितरीत करावयाची तरतुद पुढील विवरण पत्रानुसार नमुद करण्यात आलेली आहे .

💁💁हे पण वाचा : राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित, पाहा सविस्तर..

सदरच्या निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्यांच्या खाती व्याज जमा करावयाचे आहेत त्या कर्मचाऱ्यांची यादी सोबत जोडण्याची आवश्यकता नसल्याचे नमुद करण्याात आहले आहेत . सदर व्याजाचे दर हे वित्त विभागाकडून परिगणना करण्यात येईल .

या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 28 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *