राज्य कर्मचाऱ्यांना UPS / सुधारित NPS योजना नकोच ; तर OPS पेन्शन योजनाची मागणी – विधान परिषदेतील आत्ताची अपडेट !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee ops pension scheme Update  news ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे , शिवाय केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एका पेन्शन योजनेचा पर्याय निवडण्याचा कर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्राची एकीकृत पेन्शन योजना या दोन्ही पेन्शन योजनेतून , जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळत नाहीत . यामुळेच राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाच लागू करण्यात यावी अशी विरोधकांकडून विधान परिषदेत मागणी करण्यात आली ..

जुनी पेन्शन (Old pension) मध्ये मिळणारे आर्थिक लाभ सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना (New NPS) किंवा एकीकृत पेन्शन योजना (UPS ) मध्ये मिळत नाहीत , जसे की या दोन्ही योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आले आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांचे दरमहा 10 टक्के रक्कम वेतनातून कपात होते जे की , या दोन्ही पेन्शन योजनेनुसार , सदर रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसल्याचे नमूद आहेत .

यामुळे सदर पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन (Old pension) प्रमाणे लाभ मिळत नाहीत , याशिवाय भविष्य निर्वाह निधी  (GPF) सुविधा सदर नवीन पेन्शन योजनेमध्ये देण्यात आलेली नाही . यामुळे जुनी पेन्शन योजनाची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे .

यावेळी आमदारांनी जुनी पेन्शन  (Old pension) बरोबरच राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान टप्पा वाढीचा प्रश्न उपस्थित केला . अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अद्याप कमी वेतनावर बऱ्याच वर्षापासून काम करीत असल्याने , त्यांच्या अनुदानाच्या टप्प्यामध्ये वाढ करावी , अशी मागणी करण्यात आलेली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment