जुनी पेन्शन योजना व इतर 17 मागण्याबाबत मध्यवर्ती संघटनेकडून मुख्य सचिव यांना निवेदन पत्र सादर ! दि.12.10.2023

Spread the love

Live marathipepar , संगीता पवार [ Old Pension & other 17 Demand ] : राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्च 2023 मधील संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याबाबत , राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्यामार्फत महत्त्वपूर्ण निवेदन पत्र सादर करण्यात आलेला आहे .

यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , सदर पत्राच्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव पातळीवर संघटना प्रतिनिधींना जुनी पेन्शन व इतर 17 मागण्याबाबत रीतसर चर्चेची संधी देऊन प्रलंबित मागण्याबाबत ठोस निर्णय घेतले जातील , अशी अपेक्षा होती परंतु तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही त्या संदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते .

राज्याच्या माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांचे समक्ष झालेल्या चर्चेत दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत , असे चित्र निर्माण झाल्यामुळे त्या संदर्भात सर्व दूर महाराष्ट्रातील कर्मचारी , शिक्षकांच्या मनात संतप्त आहेत हे आम्ही विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणित आहोत ..

तसेच या पत्राद्वारे पत्राद्वारे कर्मचार्‍यांकडून निर्वाणीची मागणी करीत असून , जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे व इतर 17 मागण्या बाबतची ठोस निर्णय ऑक्टोबर 2023 अखेर पर्यंत घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घेऊन आवश्यक ते चर्चासत्र तातडीने आयोजित करण्यात यावे . अशी विनंती सदर निवेदन पत्रानुसार , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्यामार्फत सादर करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment