Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme , CM Declare ] : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी अधिवेशावर महामोर्चा काढण्यात आला होता , तर आज दिनांक 14 नोव्हेंबर पासून बेमुदत संप घोषित करण्यात आलेले होते .

जुन्या पेन्शनबाबत दि.13 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झाला नसल्याने , दिनांक 14 डिसेंबर पासून राज्यभरातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी झाले होते . परंतु आज विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत मोठी घोषणा करण्यात आलेली आहे .

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले कि , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत काल माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून , सदर बैठकीस अनेक अधिकारी , आमदार तसेच विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते . यावेळी जुनी पेन्शन लागू करणेबाबत राज्य सरकारने सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचा अहवाल व त्यावर राज्य शासनाची भुमिका याबाबत , सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे .

दिनांक 31 मे 2005 पुर्वी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदांवर नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यताकरीता ठेवण्यात आला आहे .यानुसार राज्यातील तब्बल 26 अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ प्राप्त होणार आहेत .त्याचबरोबर 80 वर्षावरील निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकार प्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करण्याचा देखिल प्रस्ताव मान्यतेसाठी अंतिम टप्यात आहे .त्याचबरोबर केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्ती मृत्यु उपदानाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .

जुनी पेन्शनबाबत राज्य सरकार सकारात्मक : जुनी पेन्शन बाबत राज्य शासनांकडून गठीत समितीचा अहवाल राज्य शासनांस मागील आठवड्यात सादर करण्यात आला असून , सदर अहवाचा अभ्यास राज्याचे मुख्य सचिव , वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव , सेवा विभाग यांच्यामार्फत करण्यात येत आहे . सदर अभ्यास करुन आगामी अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन बाबत निर्णय घेण्यात येईल , यामुळे कर्मचाऱ्यांना दिनांक 14 डिसेंबर 2023 पासूनचा बेमुदत संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *