Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Online Leave Process Shasan nirnay ] : राज्यातील सर्व शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या रजेचे अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने Ehrms प्रणालीमार्फत सादर करण्याबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 28 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकविषयक बाबी संदर्भात Human Resource Management System प्रणाली विकसिक करण्यात आली असून , त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत . तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधिनस्थ कार्यालयांचा उदा. आयुक्तालय , संचालनालय इ. समावेश या e HRMS प्रणालीत करण्यात येत आहेत .
सदरच्या प्रणालीवर सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांचे सेवा पुस्तकाविषय माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना दिनांक 03 मार्च 2023 च्या परिपत्रकानुसार सुचना देण्यात आलेल्या आहेत . तसेच सदर e HRMS प्रणालीमध्ये रजा ( Leave ) या सेक्शनमध्ये रजेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे . तसेच बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाणे फारच कमी असल्याचे आढळून आलेले आहेत , यामुळे e HRMS प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित होण्याकरीता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी /कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे र्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक असणार आहेत , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
याकरीता सर्वच मंत्रालयीन विभागांना सुचित करण्यात येत आहे कि , त्यांनी त्यांच्या अधिनस्थ असणाऱ्या सर्वच अधिकारी / कर्मचारी ( खुद्द आणि क्षेत्रीय ) यांना दिनांक 01.04.2024 पासून त्यांचे सर्व रजेचे अर्ज हे e HRMS प्रणालीमार्फतच सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर सर्व विभागांनी त्यांच्या अधिनस्थ सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे रजा लेखे हे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच कोणतेही रजेचे अर्ज हे ऑफलाईन घेण्यात येवू नयेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 28 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.