कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर एक आगाऊ वेतनवाढ बाबत परिपत्रक दि.10.01.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee One Increament After Transfer To Inter District ] : राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांच्या दिनांक 03.10.2003 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीनंतर एक आगाऊ वेतनवाढ लागु लागु करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .

त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या दिनांक 05.09.2023 च्या शासन परिपत्राकानुसार सुधारित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर वरील नमुद शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदली झाल्याने सेवाज्येष्ठाता शुन्य होते ,म्हणजे कर्मचाऱ्याच्या त्यांच्या पुर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक आगाऊ वेतनवाढ देण्याची तरतुद आहे .

तर ग्रामविकास विभागाच्या दिनांक 05.09.2023 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सदर बदली नंतर आगाऊ वेतनवाढ देणेबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबाजावणी अद्याप पर्यंत सुरु आहे .सदर वरील नमुद करण्यात आलेल्या शासन निर्णय व शासन परिपत्रकातील बाब विचारात घेवून सातारा जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदलीने …

आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुर्वीच्या जिल्हा परिषदांच्या गोपनिय अहवालांच्या आधारे पात्र कर्मचाऱ्यांस एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना सातारा जिल्ह्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना निर्देश दिले आहेत .

या संदर्भात सातारा जिल्हा परिषद मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता …

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment