Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : महाराष्ट्र राज्यातील शासकीय , निमशासकीय , अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर ज्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे , अशा कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळणार आहे .

1982- 83 ची जुनी पेन्शन प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा NPS धारक कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहेत . सध्या राज्य शासनाकडून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ देण्याकरिता अभ्यास समितीकडून तयार करण्यात आलेल्या पेन्शन अहवालानुसार कर्मचाऱ्यांना 2005 पासून पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन प्रमाणे लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .

अभ्यास समितीचा महत्त्वपूर्ण दिलासादायक प्रस्ताव : राज्य शासनाकडून गठीत अभ्यास समितीने महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनाकडून त्याचबरोबर तज्ञाकडून पेन्शन लागू करणेबाबत प्रस्ताव स्पष्ट आकडेवारीसह मागविण्यात आलेले होते , यानुसार अभ्यास समिती कडून राज्य शासनास सादर करावयाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे .

हे पण वाचा : अर्जित रजा रोखीकरण संदर्भात सुधारित शासन निर्णय पाहा !

पेन्शन लाभ न मिळाल्यास कर्मचारी जाणार परत संपावर : सदर अभ्यास समितीकडून उचित दिलासादायक पेन्शन लाभ न मिळाल्यास महाराष्ट्र राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून येत असल्याने , राज्य शासनाकडून उचित योग्य निर्णय घेतला जाईल .

आपण जर शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *