Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme & Retirement Age Increase Update ] : राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची दिलासादाय अपडेट समोर येत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या आता राज्य सरकारकडून पुर्ण करण्यात येणार आहेत .

जुनी पेन्शन योजना ( Old Pension Scheme )  : राज्यातील दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवा मध्ये आलेल्या शासकीय , निमशासकीय ( ZP ) तसेच अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याची मोठी दिलासादायक अपडेट समोर येत आहे . महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनांस दिनांक 26 फेब्रुवारी पासुन सुरुवात होणार आहे .

या अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागु करणेबाबत उचित / सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे . त्या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव यांनी माहिती दिली आहे .  यांमध्ये जुनी पेन्शन जशास तसे लागु करण्यात येईल कि , राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्येच जुनी पेन्शन प्रमाणे बदल करण्यात येईल , याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार ( Retirement Age )  : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे , याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , या संदर्भातील निर्णय हा अर्थसंकल्पीय अधिवेशांमध्ये होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .

परंतु या प्रस्तावास काही विधानसभा सदस्यांनी विरोध देखिल दर्शविला आहे . पंरतु या प्रस्तावास बहुमत मिळाल्यास , निश्चित राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *