लाईव्ह मराठी पेपर प्रणित पवार : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च रोजी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दिनांक 20 मार्च पर्यंत राज्यव्यापी बेमुदत संपावर होते . या संपाच्या अनुषंगाने राज्य शासनांकडून विविध पेन्शन लाभ ( केंद्र सरकारच्या धर्तीवर ) राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आले आहे , या संदर्भात राज्य शासनांच्या संचालनालय स्तरावर परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहेत .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत नोव्हेंबर 2005 नंतर रुजु झालेल्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS ) योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांना / वारसांना कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच सेवेत अपात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान मंजुर करणे संदर्भात संचालनालय स्तरावर परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .
राज्याच्या शिक्षण संचालनालयाकडून दिनांक 20 जुन व दिनांक 03 जुलै 2023 असे दोन महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि ,शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 14 जुन 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , अंशदान निवृत्तीवेतन योजना / NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना शासन सेवा काळांमध्ये मृत्यु झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या नोंदणीकृत्त वारसदारांस कुटुंबनिवृत्तीवेतन व मृत्यु उपदान लागु करण्यात येत आहेत .
त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने अकार्यक्षम झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांस रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान लागु करण्यात येत आहेत . सदरचा निर्णय हा नोव्हेंबर 2005 पासूनच पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात आल्याने , ज्या कर्मचाऱ्यांना / वारसांना रुग्णता निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळालेला नाही . अशा कर्मचाऱ्यांकडून / कार्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत .
जेणेकरुन जे कर्मचारी / वारस सुधारित निर्णयानुसार पेन्शन योजनेपासून वंचित राहणार नाहीत . आता राज्यातील उर्वरित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कधी लागु होईल् याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत .याबाबत राज्य शासनांकडून दिनांक 31 जुलै 2023 अभ्यास समितीकडून पेन्शन बाबतचा प्रस्ताव स्विकारणार आहेत .
तसेच राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालयकडून दिनांक 03 जुलै 2023 रोजी परिपत्रक काढुन वित्त विभागाच्या दि.3103.2023 व शालेय शिक्षण विभागाच्या दि.14.06.2023 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत , संबंधित कार्यालयांना कळविण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर , Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !