Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme Update ] : जुनी पेन्शन योजना संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

जुनी पेन्शन योजना संदर्भात शिवसेना नेते – सुभाष देसाई ( माजी मंत्री ) यांच्याकडून मा.राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनास दिनांक 02 मे 2024 रोजी पत्र सादर केले आहेत . सदर पत्रांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , देशातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुर्वीप्रमाणे लागू व्हावी या मागणीसाठी सातत्याने आंदोलने झाले ..

मोर्चे निघाले , नागपुर येथील भव्य मेळाव्यास माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते . त्या विराट सभेत बोलताना मा. उद्धव ठाकरे यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला  नि : संदिग्ध शब्दात संपुर्ण पाठिंबा जाहीर करुन ही न्याय्य मागणी 100 टक्के पुर्ण होईपर्यंत शिवसेना आपल्यासोबत राहील याची उपस्थितांना ग्वाही देण्यात आली आहे .

देशातील अन्य काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना ज्याप्रमाणे लागु केली तसाच न्याय महाराष्ट्रात मिळावा हा आग्रह असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत , सध्या सत्तारुढ असणारी मंडळी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत , शिवसेना मात्र खराखुरा न्याय मिळवून देईल असा विश्वास ठेवावा ही विनंती सदर पत्रांनुसार करण्यात आलेली आहे .

याबाबत शिवसेना नेते सुभाष देसाई ( माजी मंत्री ) यांच्या मार्फत दिनांक 02 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *