Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme Update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ लागु करणेबाबत , सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याची मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे . परंतु यावर अर्थतज्ञांकडून विरोधी बाजुने आपले मत व्यक्त करत आहेत .

महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत रुजु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS योजनांमध्ये बदल करुन सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ( निवृत्ती वेतन योजना ) लागु करणेबाबत दि.01 मार्च 2024 रोजी विधानसभेत जाहीर करण्यात आले . यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे , परंतु यावर अनेकांनी विरोधी बाजुनी मत व्यक्त करत आहेत .

यामुळे याबाबत अधिकृत्त शासन निर्णय / अधिसुचना निर्गमित होण्याच्या अगोदर राज्य सरकार आपले मत परिवर्तन करेल कि काय ? अशी भिती कर्मचाऱ्यांना वाटत आहे . यावर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देखिल जुनी पेन्शनमुळे राज्यावर आर्थिक संकट ओढावेल अशी भिती व्यक्त केली आहे . कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये शेवटचे मुळ वेतन + महागाई भत्ता अशी निवृत्तीवेतनाची रक्कम प्राप्त होणार आहे .

तर विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये तुटपुंजी पेन्शन मिळत आहे , यामुळे कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची मागणी होताना दिसून येत आहे . जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यात आली , तर राज्य सरकारला पेन्शनकरीता अर्थसंकल्पामध्ये निधीचे नियमित करावी लागेल , यामुळे इतर विकास कामाकरीता निधीची उपलब्धता कमी होईल , असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक ॲड.कांतीलाल तातेड यांनी मांडली आहे .

कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन / सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाची आवश्यकता : कर्मचारी हे आपले संपुर्ण आयुष्य शासन सेवेत झोकून देतात , जरी त्यांना चांगला पगार मिळत असला तरी , कोरोना सारख्या महामारीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना आपला जीव कमवावा लागला होता , त्यावेळी प्रत्येक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवेत आपली भूमिका बजावत होता , यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनची आवश्यक आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *