Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme State Govt. Bhumika ] : देशांमध्ये काही राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे . परंतु अद्याप पर्यंत राज्य शासनांकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत कोणताही उचित निर्णय घेण्यात आलेला नाही . याबाबत राज्य शासनांची नेमकी कोणती भुमिका आहे , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणुन घेवूयात ..
देशांमध्ये हिमाचल प्रदेश , राजस्थान , पंजाब , छत्तीसगढ , कर्नाटक , पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु आहे . वरील राज्यांचा विचार केला असता , यांमध्ये भाजपा विरहीत सरकार आहे . म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता असणारे राज्य बहुदा जुनी पेन्शन लागु करत आहेत . परंतु महाराष्ट्र राज्य सरकारचा विचार केला असता , तर राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करतेवेळी काँग्रेसची सत्ता होती .
सध्या महाराष्ट्र राज्य शासनांची पेन्शन बाबत भुमिका : सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी – शिवसेना ( शिंदे गट ) – राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) अशा पक्षांची सत्ता आहे . म्हणजेच राज्यांमध्ये तीन पक्षांची सत्ता आहे . यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिक सदस्य असल्याने वर्चस्व अधिक आहेत . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून केंद्र सरकारकडून पेन्शन बाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयाकडे लक्ष वेधून आहेत .
केंद्र सरकारकडून देखिल राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल करणेबाबत , समितीचे गठण करण्यात आलेले आहेत , सदर समितीचा अहवालातील तरतुदींचा विचार करुन येत्या अर्थसंकल्पांमध्ये निर्णय घेतला जाणार आहे . यानंतर केंद्र सरकारने पेन्शन मध्ये केलेल्या बदलांचा विचार करुन , राज्य शासनांकडून पेन्शन बाबत उचित निर्णय घेतला जाणार आहे .
म्हणजेच राज्य शासन हे जुनी पेन्शन बाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयावर आधारित असल्याचे दिसून येते . सध्या लोकसभा व राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका असल्याने पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आशा कर्मचाऱ्यांची आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.