Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Demand Special Upakram ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दिनांक 15 जानेवारी ते दिनांक 30 जानेवारी पर्यंत विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . दिनांक 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत होती , त्या निमित्ताने राज्यात पुढीलप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत .

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्याच्या मागणीसाठी अग्रणी संघटना असून , वेळोवेळी या संघटनेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते . दिनांक 15 जानेवारी ते दिनांक 30 जानेवारी 2024 या पंधरवाडा दरम्यान मकर संक्रांत विशेष उपक्रम राबविणेबाबत , राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हाधिकार्याकारणी यांना सुचित करण्यात आलेले आहेत .

यामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , मकर संक्रांत निमित्ताने सर्व पेन्शन शिलेदार यांचे कुटुंब यांची एकमेकासोबत ओळख भेट होण्यासाठी तसेच जुनी पेन्शनच्या जनजागृती करीता सर्व तालुका व जिल्हास्तरावर दिनांक 15 जानेवारी ते 30 जानेवारी 2024 दरम्यान मकर संक्रांत विशेष उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर कार्यक्रमांचे स्वरुप हे पुढीलप्रमाणे असणार आहेत .

तालुका व जिल्हास्तरावर हळदी – कुंकू गेट – टुगेदर आयोजित करुन Vote For OPS  मोहिमेवर चर्चा करणे . Vote For OPS ची पतंग उडविणे , तसेच प्रत्येक ऑफीस शाळा , कार्यालयात तिळगूळ आणि Vote For OPS चर्चा करुन त्याचे फोटो , सेल्फी स्टेट्स वर ठेवणे , सोशल मिडीयावर प्रसिद्धी देणे , महिला सोबतच पुरुषाने सुद्धा या उपक्रमात सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

अशा प्रकारचे कार्यक्रम / उपक्रम सदर पंधरवाडा दरम्यान घेण्याचे निर्देश जुनी पेन्शन संघटना मार्फत देण्यात आलेले आहेत . या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत निर्गमित निर्गमित करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाह शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *