Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme shasan nirnay gr ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनांच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत राज्य शासनांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांकडून दिनांक 11 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांनुसार राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनांच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभागाच्या दिनांक 03 मार्च 2023 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून निर्णय घेण्यात आला आहे .
सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , जे अधिकारी / कर्मचारी दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रेाजी अथवा ज्यानंतर शासन सेवांमध्ये नियुक्त झाले आहेत , तसेच ज्यांची पदभरतीची जाहीरात / अधिसुचना ही दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी निर्गमित करण्यात आलेली आहे . अशा राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेत नियम 1982 , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधी निधी नियम 1998 व त्या अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागु करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आलेला आहे .
सदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयानुसार , सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अधिक्षक अभियंता संवर्गात सध्या कार्यरत असणाऱ्या व सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची राज्य शासनांच्या सेवेतील प्रथम नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा – 2004 दिनांक 15 सप्टेंबर 2004 नुसार म्हणजेच दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित केल्यानुसार झालेली आहे .
या संदर्भातील दिनांक 11 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.