Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Pension Options ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन करीता नविन पेन्शनचा पर्याय देणेसंदर्भात राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहेत . यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु न करता , राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्येच बदल करुन नविन पेन्शन प्रणाली अंमलात येणार आहेत .
पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात येणार नाही ; पेन्शनचा नविन पर्याय हा दि.01.11.2005 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु न करता निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापासून अंमलात येणार असल्याचे सांगण्यात येत आहेत , ज्यामुळे कोणालाही थकबाकी मिळणार नाही अशा प्रकारची माहिती राज्य वित्त विभागातील अधिकाऱ्यांने दिली आहे . पेन्शन बाबत राज्य शासनांने गठीत अभ्यास समितीच्या अहवालास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अनुकुलता दर्शविल्याने सदर पेन्शनच्या पर्यायास सकारात्मक पाऊले उचलण्यात येणार आहेत .
जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार : या नविन सुधारित पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे सेवानिवृत्ती उपदान , अर्जित रजेचे रोखिकरण तसेच गट विमा योजनेचे रक्कम मिळणार आहेत . तर राष्ट्रीय पेन्शन योजनांमधील कपाती पुर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत , तर सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांस मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल यावर महागाई भत्ता देखिल दिला जाणार आहे .
कुटुंबनिवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार : तर कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी मध्ये मृत्यु झाल्यास अशा प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनाच्या वेळी निश्चित होणाऱ्या वेतनाच्या 60 टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून अदा करण्यात येणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांने सांगितले आहेत .
कर्मचाऱ्यांना नविन पेन्शन पर्याय घेण्याचा पर्याय : राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नविन पर्याय व विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजनांचा पर्याय घेणेबाबत पर्याय असणार आहेत . याकरीता कर्मचाऱ्यांना कोणत्याही एका पर्यायाची निवड करावी लागणार आहे . त्याचबरोबर माहे डिसेंबर 2024 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखिल एका महिन्यांच्या आत एका पर्यायाची निवड करावी लागणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.