Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme Update ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ सरसकट लागु होणार का ? असा प्रश्न सर्वांना पडत आहे . नुकतेच राज्य शासनांने जुनी पेन्शन बाबत , घेतलेल्या निर्णयानंतर इतर एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची आशा पल्लवित झाली आहे .

मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णय नेमका काय आहे : दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये , राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वीच्या जाहीरातीनुसार , राज्य शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजु झालेल्या सर्व राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे .

म्हणजेच जर कर्मचाऱ्यांची रुजु तारीख ही 2005 नंतर कधीही झाली असेल , परंतु सदर पदांची जाहीरात जर दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वीची असल्यास , सदर सर्व आस्थापनावरील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनांचा लाभ सरसकट लागु करण्यात आलेला आहे . म्हणजेच या निर्णयानुसार राज्यातील केवळ 3 ते 4 हजार अधिकारी / कर्मचाऱ्यांनाच जुनी पेन्शनचा लाभ होणार आहे . याकरीता सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा पर्याय पुढील 06 महिन्यांच्या आत निवड करायची आहे .

सरसकट पेन्शनचा लाभ मिळणार का ? : सदरचा वरील निर्णय हा केंद्र सरकारने यापुर्वीच घेतला होता , त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आला आहे . आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील इतर सर्व शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन ( Old Pension ) बाबत अधिकृत्त निर्णय राज्य अर्थसंकल्पांमध्ये घेण्यात येईल .

💁💁 तलाठी निकाल 2023 पाहा

जुनी पेन्शन का इतर पर्याय योजना : राज्य कर्मचाऱ्यांकडून इतर पर्याय पेन्शन योजनांस विरोध दर्शविला आहे , यामुळे राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनांच्या मागणीवर ठाम आहेत . परंतु राज्य शासंनाकडून जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्राप्त होईल , अशा प्रकारची पेन्शन योजना लागु करण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *